महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणाऱ्या दोघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच मारहाण केल्याप्रकरणी २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाराम रूपाराम चौधरी (वय ४४), नरेश चौधरी (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शिव परांडे (वय ५५), मंगेश साळुंके (वय ३२, दोघे रा. धानोरी) यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिक्रमण विभागातील आधिकारी प्रकाश कुंभार (वय ४८) यांनी या संदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विश्रांतवाडी भागात दुकानदार, पथारीवाल्यांनी केलेले बेकायदा बांधकाम, फलक, पत्र्याच्या शेडवर अतिक्रमण विभागाकडून मंगळवारी दुपारी कारवाई करण्यात आली. त्या वेळी आरोपींनी या कारवाईला विरोध केला.

कात्रजमधल्या स्फोटाप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक; १०० हून अधिक सिलेंडरचा केला होता बेकायदा साठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिक्रमण विभागातील निरीक्षक अनिल परदेशी आणि पथकातील कर्मचाऱ्यांवर जमावाने हल्ला केला. जेसीबी यंत्रावर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी जमावाला रोखून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर या प्रकरणात कारवाई करून दोघांना अटक करून २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.