पुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात ट्रकचालकाला चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. प्रकाश उर्फ पक्या देवराम परिहार (रा. राम मंदिराजवळ, लोहियाननगर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत किशोर भागचंद रोमण (वय ३१, रा. पोवळवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रोमण मार्केट यार्डातील फळबाजारात शेतीमाल घेऊन आले होते. केळी बाजारात त्यांनी ट्रक लावला. परिहारने रोमण यांना चाकूचा धाक दाखविला. रोमण यांच्या खिशातील मोबाइल संच आणि रोकड असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला.

हेही वाचा…पुणे : उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात टाकून महिलेचा खूनाचा प्रयत्न; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तो पसार झाला. या घटनेची माहिती रोमण यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी परिहारला ताब्यात घेतले. परिहार सराइत चोरटा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.