पुणे : राज्य पोलीस दलातील उपायु्क्त दर्जाच्या १५ अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश गृहविभागाने बुधवारी सायंकाळी दिले. पुणे पोलीस दलातील परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांची लातूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले.

हेही वाचा : पीएमपीच्या मेट्रो पूरकसेवेचा विस्तार; रामवाडी ते ‘इंटरनॅशनल टेक पार्क’पर्यंत बससेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्त मगर, वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांची पुणे पोलीस दलातून बदली करण्यात आली. त्यानंतर पुणे पोलीस दलात तीन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली. गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड विभागाचे अधीक्षक राजकुमार शिंदे यांची पुणे पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्याचे आदेश गृहविभागाने दिले.