शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच कोयता गँगसारख्या टोळक्यांचा उच्छाद या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तीन हजार ७०० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. दहशत निर्माण करणाऱ्या आणि सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे हेही वाचा >>>धोरण रितेशकुमार यांनी अवलंबिले आहे. सराईत आणि अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी यापुढे प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचे रितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: भाजपचा ‘कसब्या’चा उमेदवार आज रात्रीपर्यंत जाहीर होणार

सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यादृष्टीने कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात आले आहेत. रेकॉर्डवरील तसेच सराईत गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगार आदान-प्रदान, दत्तक गुन्हेगार अशा योजना राबवून गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यात येत आहे.

हेही वाचा >>>“अजित पवारांवर अनेक वेळा अन्याय पण त्यांना तो…” चंद्रकांत पाटलांचं विधान

रितेशकुमार यांनी पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेतल्यापासून मोहीम राबवून तीन हजार ७०० सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा तसेच विघातक कृत्यास आळा घालण्याच्या दृष्टीने तिघांना कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह आणि नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. रेकॉर्डवरील ४२ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) नऊ टोळ्यांमधील ६५ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.

……………………….

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police took preventive action against 3700 criminals after the koyta gang was busted pune print news amy
First published on: 03-02-2023 at 18:43 IST