पुणे : ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला आठवडा उलटून गेल्यानंतरही सरकारकडून कारवाईचे स्पष्ट संकेत दिले जात नाहीत. केंद्र सरकार अमेरिकेच्या परवानगीनंतर पाकिस्तानवर कारवाई करणार का?’ असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी उपस्थित केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार जेसन मिलर यांना पाकिस्तान विरोधात लॉबिंग करण्यासाठी दीड लाख डॉलर मिळणार असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून केला.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी देशातील जनतेने केली आहे. मात्र, हल्ल्याला आठवडा उलटून गेल्यानंतरही सरकारकडून कारवाईचे स्पष्ट संकेत दिले जात नाहीत. या प्रकरणात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार जेसन मिलर यांची सल्लागार म्हणून नेमणूक का करण्यात आली आहे? पाकिस्तान विरोधात लॉबिंग करण्यासाठी मिलर यांना दीड लाख डॉलर मिळणार आहेत का? असे सवाल प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी उपस्थित केले.


ते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाने नेमणूक केली आहे का? आता अमेरिकेकडून परवानगी आल्याशिवाय पाकिस्तानवर कारवाई करणार नाही का? या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत. दोन्ही देशातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. आता या प्रकरणावरून लॉबिंग सुरू झाले आहे का, हेही सरकारने स्पष्ट करावे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंबेडकर म्हणाले, ‘जेसन मिलर डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार होते. त्यांची या प्रकरणी नेमणूक करण्यात आली आहे. ‘डॉन’ने ही बातमी चार दिवसांपूर्वी दिली होती. काल पाकिस्तानमधील सगळे युट्यूब चॅनेल बंद करण्यात आले आहेत.