पुणे-सोलापूर एक्सप्रेस सेवा पूर्ववत

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने १५ सप्टेंबरपासून ट्रेन क्रमांक ११४१७ / ११४१८ पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेसची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे-सोलापूर एक्सप्रेस सेवा पूर्ववत
( संग्रहित छायचित्र )

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने १५ सप्टेंबरपासून ट्रेन क्रमांक ११४१७ / ११४१८ पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेसची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ११४१७ पुणे – सोलापूर एक्स्प्रेस १५ सप्टेंबरपासून पुण्याहून रात्री अकरा वाजता सुटेल आणि सोलापूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५५ वाजता पोहोचेल आणि गाडी क्रमांक ११४१८ सोलापूरहून १५ सप्टेंबरपासून सकाळी ११.४० वाजता सुटेल आणि पुण्याला सायंकाळी ७.२५ वाजता पोहोचेल.

ही गाडी हडपसर, मांजरी, लोणी, उरुळी, यवत, केडगाव, पाटस, दौंड, मलठण, भिगवण, जिंतूर रोड, पारेवाडी, वाशिंबे, पोफळज, जेऊर, भाळवणी, केम, ढवळस, कुर्डुवाडी, वडशिंगे, माढा, वाकाव, अनगर, मलिकपेठ, मोहोळ, मुंढेवाडी आणि पाकणी या स्थानकांवर थांबणार असून या गाडीला द्वितीय श्रेणीतील १२ डबे असतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी ; स्वातंत्र्यदिनासाठी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी
फोटो गॅलरी