पुणे : पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत इतिहास घडला. मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ पहिल्यांदाच दुपारी चार वाजता लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर दाखल झाले आहे. या मंडळाने दिलेला शब्द पाळल्याने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीची लवकर सांगता होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी सुसंगत श्री गणाधीश रथामध्ये विराजमान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नियोजित वेळेत मार्गस्थ झाला. मिरवणुकीला होणारा उशीर लक्षात घेता यंदा बेलबाग चौकातून दुपारी चार वाजता मंडळाची मिरवणूक सुरू करण्यात आली. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विसर्जन मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी आहे.

Tree cutting branches on the road negligence of Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई : वृक्षछाटणीच्या फांद्या रस्त्यावर, नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष; प्रवासी, नागरिक यांना अडथळा
unique solution to traffic congestion in Pune A two-wheeled ambulance will run on the road
पुण्यातील वाहतूक कोंडीवर अनोखा उपाय! रस्त्यावर धावणार दुचाकी रुग्णवाहिका
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध

हेही वाचा : Pune Ganpati Visarjan 2023 Live : विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहात मेघगर्जना आणि पावसाच्या सरी

प्रभात, दरबार ही बँडपथके, स्व-रूपवर्धिनीचे ढोल-लेझीम पथक, सनई-चौघडांची मंडळाला साथ आहे. दरवर्षी हे मंडळ मध्यरात्री लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होत असते. मात्र, यंदा या मंडळाने दुपारी चार वाजताच मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या मंडळांनी दिलेला शब्द पाळल्याने यंदा विसर्जन मिरवणुकीची लवकर सांगता होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.