पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत विद्यापीठाशी संलग्न सर्व शैक्षणिक विभाग आणि संशोधन केंद्र यांच्याकडून मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शकांना त्यांच्याकडील रिक्त जागेचा तपशील सादर करण्यास ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रातील मान्यताप्राप्त मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी http://bcud.unipune.ac.in/root/login.aspx या दुव्याद्वारे रिक्त जागांची माहिती सादर करण्यात २० ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. ज्या मार्गदर्शकांना शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये विद्यार्थी मार्गदर्शनासाठी घ्यायचे नाहीत, त्यांनीही नोंदणीकृत विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती सादर करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. मार्गदर्शकांनी तांत्रिक अडचणीसाठी phdtracking_support@pun.unipune.ac.in या संकेस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.