पुणे : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ७३ गटांची आरक्षण सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार अनुसूचित जातींसाठी सात, अनुसूचित जमातींसाठी पाच आणि नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी १९ असे गट राखीव झाले आहेत. त्यापैकी दहा जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
दरम्यान, आरक्षणाचा फटका काही मोठ्या नेत्यांना बसणार असून त्यांना अन्य पर्याय शोधावा लागणार असल्याचे सोडतीनंतर स्पष्ट झाले.
जिल्हा परिषदेच्या गटांसाठीची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी चारुशीला मोहिते-देशमुख, कुळ कायदा शाखेचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, निवडणूक शाखेचे तहसीलदार राहुल सारंग यावेळी उपस्थित होते. हवेली तालुक्यातील गाऊडदरा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
आरक्षणानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ गट राखीव झाले असून त्यापैकी २० गट महिलांसाठी राखीव आहेत. एकूण ७३ गटांपैकी ३७ गट महिलांसाठी राखीव झाले असून त्यामध्ये अनुसूचित जाती सात गट असून त्यापैकी चार गट महिलांसाठी, अनुसूचित जमातींसाठी पाच गट असून त्यापैकी तीन गट महिलांसाठी तर नागरिकांचा मागासर्वग प्रवर्गासाठी १९ गट राखीव झाले असून त्यापैकी दहा गट महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
भिगवणऐवजी लोणीकाळभोर
नवीन आरक्षण पद्धतीनुसार अनुसूचित जाती आणि जमाती यांचे आरक्षण हे जिल्ह्यातील गटांमध्ये सर्वाधिक लोकसंख्येच्या गटापासून उतरत्या क्रमाने काढणे अपेक्षित आहे. मात्र, अनुसूचित जाती गटाचे आरक्षण काढताना हवेली तालुक्यातील लोणीकाळभोर गटाऐवजी इंदापूर तालुक्यातील भिगवण गट आरक्षित असल्याचे सांगण्यात आले. उरुळी देवाची येथील देवा गायकवाड या नागरिकाने भिगवण गटातील अनुसूचित जातीची लोकसंख्या लोणीकाळभोरपेक्षा कमी असल्याची बाब जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर निवडणूक शाखेची चूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी भिगवण ऐवजी लोणीकाळभोर गटाची सोडत काढण्यात आली.
अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गट
-इंदापूर – ७१ लासुर्णे
-इंदापूर – ७० वालचंदनगर
-बारामती – ६१ गुणवडी
-हवेली – ४१ लोणीकाळभोर
अनुसूचित जाती (पुरुष) प्रवर्गासाठी राखीव गट
-बारामती- ६५ निरावागज
-दौंड -४५ गोपाळवाडी
– हवेली- ३९ उरुळीकांचन
अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गट
-जुन्नर – ८ बारव
-जुन्नर – १ डिंगोरे
-आंबेगाव – ९ शिनोली
अनुसूचित जमाती (पुरुष) प्रवर्गासाठी राखीव गट
-खेड- २१ वाडा
-मावळ- २९ टाकवे बुद्रूक
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी राखीव गट
-खेड – २२ कडुस
-बारामती – ६० सुपा
-हवेली – ४० थेऊर
-शिरूर – १५ न्हावरा
-जुन्नर – ४ राजुरी
-जुन्नर – ६ नारायणगांव
-जुन्नर – २ ओतूर
-पुरंदर – ५३ नीरा शिवतक्रार
-जुन्नर – ५ बोरी बुद्रूक
-इंदापूर – ६७ पळसदेव
नागरिकांचा मागास (पुरुष) प्रवर्गासाठी राखीव गट
-हवेली – ३७ पेरणे-
-वेल्हे – ५५ वेल्हे बुद्रूक
-खेड – २५ मेदनकरवाडी
-मुळशी – ३६ पिरंगुट
-.शिरूर – २० मांडवगण फराटा
-दौंड – ४९ यवत
-आंबेगाव – १३ अवसरी बुद्रूक
-भोर – ५६ वेळू
-मुळशी- ३४ पौड
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव गट
-खेड – २३ रेटवडी
-दौंड – ४७ पाटस
-बारामती – ६३ वडगाव निंबाळकर
-शिरूर – १९ तळेगाव ढमढेरे
-इंदापूर – ६९ निमगाव केतकी
-मावळ – ३१ खडकाळे
-आंबेगाव – ११ कळंब
-दौंड – ४४ वरवंड
-शिरूर – १८ शिक्रापूर
-आंबेगाव – १० घोडेगाव
-मावळ – ३० इंदुरी
-हवेली – ४२ खेड शिवापूर
-खेड – २६ पाईट
-इंदापूर – ६६ भिगवण
-शिरूर – १६ रांजणगाव गणपती
-खेड – २८ कुरुळी
-मावळ – ३३ सोमाटणे
-इंदापूर – ७३ बावडा
-पुरंदर – ५० गराडे
-हवेली – ३८ कोरेगाव मुळ
सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव जागा
-शिरूर-१७ पाबळ
-जुन्नर- ३ आळे
-भोर- ५९ उत्रौली
-दौंड- ४६ खडकी
-बारामती-६२ पणदरे
-आंबेगाव- १२ पारगाव तर्फे अवसरी बुद्रूक
-पुरंदर ५२ वीर
-दौड – ४८ बोरीपार्धी
-मुळशी- ३५ हिंजवडी
-पुरंदर- ५१ बेलसर
-खेड- २४ पिंपळगाव तर्फे खेड
-जुन्नर- ७ सावरगाव
-दौंड ४३ राहू
-भोर- ५७ भोंगवली
-शिरूर- १४ कवठे येमाई
-मावळ -३२ कुसगाव बुद्रूक
-वेल्हे- ५४ विंझर
-इंदापूर- ७२ काटी
-बारामती-६४ निंबूत
-खेड- २७ नाणेकरवाडी
-इंदापूर- ६८ वडापुरी
– भोर- ५८ भोलावडे