scorecardresearch

पुणेरी मेट्रोला महामेट्रोशी जोडणार!, दीडशे मीटरचा पादचारी पूल उभारणार

हा पादचारी पूल १५० मीटरचा असणार आहे. या पुलामुळे दोन्ही मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकात जाणे सोपे होणार आहे.

pune metro connected to mahametro
पुणेरी मेट्रोला महामेट्रोशी जोडणार!

पुणे : पुणेरी मेट्रो आणि शिवाजीनगर मेट्रो यांची स्थानके जिल्हा न्यायालय परिसरात आहेत. या दोन्ही स्थानकांना पादचारी पुलाने जोडण्यात येणार आहे. हा पादचारी पूल १५० मीटरचा असणार आहे. या पुलामुळे दोन्ही मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकात जाणे सोपे होणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणेरी मेट्रो म्हणजे हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे काम सुरू आहे. याचवेळी महामेट्रोचा पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय हा मार्ग सध्या सुरू आहे. या मार्गावर शिवाजीनगर येथे इंटरसेक्शन स्थानक आहे. या स्थानकात दोन्ही मेट्रोंना आतमध्ये प्रवेश करता येणार आहे अथवा बाहेर पडता येणार आहे. सध्या महामेट्रोचे स्थानक जिल्हा न्यायालय परिसरात आहे. याचवेळी पीएमआरडीएकडून जिल्हा न्यायालय परिसरातच स्थानकाची उभारणी केली जात आहे.

mumbai metro
तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो १ विस्कळीत
maha metro
पक्ष्यांनी मेट्रोचा मार्ग अडविला; ओव्हरहेड केबलला धडकल्याने सेवा अर्धा तास खंडित
peeding up construction of Hadapsar Railway Terminal
पुणे रेल्वे स्थानकाला लवकरच पर्याय! हडपसर रेल्वे टर्मिनल उभारणीला गती
traffic on Phadke Road in Dombivli due to vehicles , Dombivli , Phadke Road , Dombivli news
उलट मार्गिकेतून येणाऱ्या वाहनांमुळे डोंबिवलीतील फडके रस्त्यावर कोंडी

हेही वाचा >>> रक्षक झाला भक्षक…, पोलीस कर्मचाऱ्याकडून शाळकरी मुलीशी अश्लील वर्तन

पुणेरी मेट्रो आणि महामेट्रोच्या प्रवाशांना या दोन्ही स्थानकांमध्ये ये जा करणे सोपे व्हावे, यासाठी पादचारी पुलाने ही स्थानके जोडण्यात येणार आहेत. हा पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. या पादचारी पुलाचा आराखडा तयार आहे. पुणेरी मेट्रोच्या जिल्हा न्यायालय परिसरातील स्थानकाचे काम पूर्ण होत आले की या पादचारी पुलाचे काम सुरू होईल, अशी माहिती महामेट्रोचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ यांनी दिली.

परतीच्या तिकिटाची वैधता दिवसभर

महामेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशाने परतीचे तिकीट काढले असेल तर त्याची वैधता पूर्ण दिवसभर आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून हा नियम आहे. सेवा सुरू असलेल्या कालावधीत दिवसभरात प्रवाशांना परतीच्या तिकिटाने प्रवास करता येतो, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली.

पुणेरी मेट्रो आणि महामेट्रो यांच्या जिल्हा न्यायालय परिसरातील दोन स्थानकांमध्ये १५० मीटरचे अंतर आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी ही स्थानके पादचारी पुलाने जोडली जाणार आहेत. हे काम पीएमआरडीएकडून केले जाईल. – रिनाज पठाण, अधीक्षक अभियंता, पीएमआरडीए

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Puneri metro will be connected with mahametro a pedestrian bridge of 150 meters will be constructed pune print news stj 05 ysh

First published on: 04-10-2023 at 11:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×