पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे लाच देऊन आग्र्याहून सुटले, त्यांनी औरंगजेबाच्या वजीराला, त्यांच्या पत्नीला तसंच अनेक सरदारांना लाच दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे मिठाईच्या पेटाऱ्यातून वगैरे सुटले नाहीत असं विधान ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे.

दरम्यान ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी काल पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युट विश्वस्तपदाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडी दरम्यान पुण्यातील विधानभवन येथे पुणे विभागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री मंत्री शंभूरराज देसाई हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री शंभूरराज देसाई यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधत अनेक राजकीय घडामोडी बाबत भाष्य देखील केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधान केल्याप्रकरणी राहुल सोलापूरकर यांच्यावर सरकारकडून कारवाई होणार का? त्या प्रश्नावर शंभूरराज देसाई म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राहुल सोलापूरकर यांनी केलेल विधान निंदनीय आणि निषेधार्ह आहे. तसेच प्रकरणी राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाच्या व्हिडिओ क्लिपबाबत तपासणी करावी, कोणत्या पार्श्वभूमीबाबत बोलले आहेत. त्याबाबत तपासणी करावी आणि याबाबत सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे. त्याचबरोबर राहुल सोलापूरकर यांनी केवळ दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही. तर रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर नाक घासून राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.