पुणे : आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने पुण्यावर लक्ष्य केंद्रित केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. राज ठाकरे यांचा हा दौरा खासगी असल्याचे सांगितले जात असले तरी, काही मोजक्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते चर्चा करण्याची शक्यता आहे.

मनसेकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने पुणे मतदारसंघावर पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राज यांचे चिरंजीव अमित यांच्याकडे पुण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून अमित ठाकरेही सातत्याने पदाधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठका घेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी विभाग प्रमुख आणि उप विभाग प्रमुखांबरोबर चर्चा केली होती. राज ठाकरे यांनी त्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना लोकांपर्यंत पोहोचा, कामे करा, अशी सूचना केली आहे. त्यानुसार राज पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची चर्चा होती. मात्र राज ठाकरे पुण्यात आले असले तरी, ते पक्षाची कोणतीही अधिकृत बैठक घेणार नाहीत.

हेही वाचा – आता थांबायचं नाही, हक्कावर गदा येत असेल तर लढायचं – छगन भुजबळ

हेही वाचा – प्रकाश आंबेडकर म्हणाले, “तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगल…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नसमारंभासाठी ते पुण्यात आले असून पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मात्र काही मोजक्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.