आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महासंपर्क अभियानासाठी अमित ठाकरे शुक्रवारपासून (१२ ते १४ ऑगस्ट) या कालावधीत पुणे दौऱ्यावर येणार असून महाविद्यालयीन तरूणांशी अमित ठाकरे संवाद साधणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात त्यांचा दौरा असेल.

अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यानंतर ते पुणे दौऱ्यावर येणार असून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील विविध मतदारसंघात जाऊन ते पक्षबांधणीसाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, महिला सेनेतील पदाधिकाऱ्यांबरोबरच शहर मनसे पदाधिकाऱ्यांबरोबरही ते विविध विषयांवर संवाद साधणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

या दौऱ्यात विशेषत: महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्याचा प्रयत्न अमित ठाकरे करणार आहेत. अमित ठाकेर पुण्यातील ८ आणि शिरूर लोकसभा मंतदार सघातली मधील ५ विधानसभा मतदार संघात जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. शहरातील कोथरूड, खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा, कॅन्टोन्मेंट या ठिकाणी दौरा शुक्रवारी(१२ ऑगस्ट) होणार असून शनिवारी (१३ ऑगस्ट) पर्वती, हडपसर, पुरंदर, पिंपरी चिंचवड, मावळ या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी (१४ ऑगस्ट) शिरूर, चाकण आणि खेड मध्ये त्यांचा दौरा असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या विविध भागात दौरे करत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीवही मैदानात उतरले असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीवर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे.