scorecardresearch

औरंगाबादला जाताना वढू-तुळपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेणार राज ठाकरे

साडेसात वाजण्याच्या सुमारास १०० ते १५० ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन पुण्यामधून औरंगाबादच्या दिशेने निघाणार राज ठाकरे

Raj Tuljapur
मनसे पुणे शहराध्यक्षांनी दिली माहिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेआधी आज पुण्यात दाखल झालेत. आज राज ठाकरे हे पुण्यामध्येच मुक्कामी असून ते उद्या सकाळी साडेआठच्या सुमारास पुण्यावरुन औरंगाबादच्या दिशेने रवाना होतील. मात्र औरंगाबादला जाण्याच्या मार्गावर राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहेत. राज ठाकरेंच्या उद्याच्या या कार्यक्रमासंदर्भातील माहिती मनसेचे पुणे शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी दिली आहे.

पुण्यातुन बाहेर पडताना राज ठाकरेंचा ताफा वढू-तुळपूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहे. या ठिकाणी राज ठाकरे समाधी स्थळाचं दर्शन घेऊन पुढील दौऱ्यासाठी निघणार असल्याचं, बाबर यांनी स्पष्ट केलंय.

साडेआठ वाजता राज ठाकरे पुण्यातून औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यापूर्वी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास १०० ते १५० ब्राह्मण पुढील कार्य चांगल्याप्रकारे पार पाडावे यासाठी राज ठाकरेंना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. पुण्यातील ‘राजमहाल’ येथील निवासस्थानीच राज ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन औरंगाबादच्या दिशेने रवाना होतील.

मुंबई येथून राज ठाकरेंचे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुण्यातील ‘राजमहाल’ येथील निवासस्थानी आगमन झाले. त्यावेळी कार्यकर्ते देखील उपस्थित होते. आज संध्याकाळी राज काही मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचं सांगितलं जातं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray to visit sambhaji maharaj memorial in tulapur while on his way to aurangabad for sabha svk 88 scsg