महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मी जनतेच्या मनातील आमदार असून जनता मला निवडून निवडून देईल. अजित पवार हे मला आमदार करणार नाहीत जनता करणार आहे. त्यामुळे मी अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचे ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले आहे. राहुल कलाटे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत शड्डू ठोकला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. 

हेही वाचा- कसबा पोटनिवडणूक : हिंदू महासंघ संघटनेच्या आनंद दवेंचा उमेदवारी अर्ज दाखल

राहुल कलाटे यांनी म्हटले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राजकीय गणित २००९ पासून पाहिल्यास या मतदारसंघात राष्ट्रवादी अपयशी ठरलेली आहे. त्याकाळात देखील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला होता. पुढे ते म्हणाले की, २०१९ च्या विधानसभेत मी देखील अपक्ष लढलो होतो. तेव्हा, मोदी लाटेत कुठलाच नेता निवडणूक लढायला तयार नव्हता.

हेही वाचा- “दादा, मी राजीनामा दिलेला आहे, तो माझा…”,अजित पवारांनी दिली बाळासाहेब थोरातांच्या फोनची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ ची लाट पाहिल्यानंतर आज जे उमेदवार पुढे आले आहेत. त्यांनी निवडणूक लढवली नाही. मला तेव्हा, जनेतने आणि विविध संघटनांनी पाठिंबा देत चांगला प्रतिसाद दिला. १ लाख १२ हजार मते दिली. माझ्याकडे एक आश्वासक चेहरा म्हणून जनतेने पाहिले. अजून ही या मतदारसंघातील नागरिक मला जनतेतील आमदार म्हणून संबोधतात. नेते नाहीत तर जनता मला निवडून आणणार आहे. जनता निर्णय घेणार आहे कोणाला निवडणूक द्यायचे आणि आमदार बनवायचे अजित पवार नाहीत असे कलाटे यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, जनतेसाठी मी दिवसरात्र काम केले. आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरण्यास आलो तेव्हा नागरिकांचा प्रतिसाद जास्त होता. मी निवडणूक लढवण्यावर आज ही ठाम आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज भरताना बरेच कार्यकर्ते नव्हते. माझ्यासोबत ठाकरे गटाचे सैनिक आहेत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.