भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘स्वराज्य, स्वातंत्र्य, सुराज्य’ या मोहिमेची ‘एशिया आणि इंडिया बुक रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. या अंतर्गत महाविद्यालयाने महाराष्ट्रातील ७५ गड-किल्ल्यांच्या वर एकाच वेळी आरोहण, बीज आणि वृक्षारोपण करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांनी या विषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही भारतीय या संकल्पनेअंतर्गत ‘स्वराज्य, स्वातंत्र्य, सुराज्य’ ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेची नोंद ‘एशिया आणि इंडिया बुक रेकॉर्ड‘मध्ये झाल्याचे प्रमाणपत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले. सर्वांसाठी एकच पृथ्वी या ‘युनेप’ने घोषित केलेल्या पर्यावरण सूत्रात या मोहिमेची मांडणी करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्र संघाने सुनिश्चित केलेले शाश्वत विकास उद्दिष्ट-२०३० आणि २०७०पर्यंत भारत कार्बन-उत्सर्जन-मुक्ती, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी मध्यवर्ती मानून भारती विद्यापीठाचे प्र-कुलगरू डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपक्रमात जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातील ७५ गड-किल्ल्यांवर एकाच वेळी आरोहण, बीज आणि वृक्षारोपण करण्यात आले. तसेच भारती विद्यापीठातील पन्नास सायकलस्वारांनी सिंहगड ते रायगड हा १४२ किलोमीटर प्रवास करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तर विद्यापीठातील विविध १४ विद्याशाखातील, देशातील सुमारे १३ राज्ये आणि २ केंद्र शासित प्रदेशातील ७५ विद्यार्थिनीनी सिंहगड आरोहण करून, नव्या शैक्षणिक धोरणाचे स्वागत, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.