पुणे : दोन वर्षानंतर यंदा उत्साहात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या विलंबाची नैतिक जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत, अशी भावना मानाच्या गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केली. त्यासंदर्भात कार्यकर्त्यांच्या पातळीवर आत्मपरीक्षण सुरू असून पुढील वर्षी चित्र बदललेले असेल, असा विश्वास या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

हेही वाचा <<< पदभरती परीक्षांतील प्राधान्य क्रमवारीच्या निकषांत एमपीएससीकडून बदल

पुढील वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पथकांची संख्या कमी करता येईल का?, पथकातील वादकांच्या संख्येवर मर्यादा असावी का? याचा विचार केला जाईल. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत. आमच्याकडून शक्य आहेत त्या गोष्टी करुन पुढच्या वर्षीची विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मानाच्या गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. 

हेही वाचा <<< पिंपरी : पालिका व आयटीडीपी संस्थेत सामंजस्य करार ; वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल

श्री कसबा गणपती मंडळाचे ॠग्वेद निरगुडकर, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, श्री केसरीवाडा गणेशोत्सवाचे अनिल सकपाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा <<< कर्ज प्रकरणातील तगाद्यामुळे जामीनदाराची आत्महत्या; पोलिसांसह तिघांवर गुन्हा

पंडित म्हणाले, यंदा दोन वर्षांनंतर उत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्तांच्या भावना उर्त्स्फूत होत्या. मिरवणूक मार्गावर नागरिकांच्या गर्दीने मिरवणुकीचा वेग मंदावला. मिरवणूक सुरळीत पार पाडणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी असली तरी आम्ही विलंबाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पुढील रुपरेषा ठरवणार आहोत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Responsibility delay immersion procession respected ganapati mandal office bearers pune print news ysh
First published on: 13-09-2022 at 19:30 IST