पिंपरी : पिंपरी-चिंंचवडमध्ये कोयता गँगाचा पुन्हा उच्छाद सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपळे गुरवमध्ये टोळक्याने तरुणावर वार केल्याच्या प्रकारानंतर फुलेनगर आणि मोहननगरमध्ये कोयते घेऊन टोळक्याने दहशत माजविल्याचा प्रकार घडला.

याप्रकरणी सुमित कमलाकर दाभाडे (वय २१), अक्षय राजू कापसे (वय २०, दाेघेही रा. माेहननगर,चिंचवड) दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, साेन्या काळे, प्रतीक या दाेघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने पिंपरी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – पुण्यातून चोरलेल्या सोन्याच्या मुकुटाची मुंबईतील झवेरी बाजारात विक्री

आरोपींनी चिंचवडच्या मोहननगर आणि फुलेनगर येथे दुचाकीवरून जात असताना दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने मोठमोठ्याने हॉर्न वाजविले. हातात कोयते घेऊन दहशत माजवली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. फिर्यादी महिला या रस्त्याच्या कडेला थांबल्या असताना त्यांच्यावर कोयता उगारला. तसेच एका मुलीची छेड काढण्यात आली. पाेलिसांनी सुमित आणि अक्षयला अटक केली आहे. पिंपरी पाेलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा – पहिले बालरंगभूमी संमेलन पुण्यात, संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची निवड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, निवडणुकीनंतर शहरात कोयता गँगने पुन्हा डोकेवर काढले आहे. गुन्हेगारांच्या हाती सर्रासपणे कोयता दिसत आहे. कोयता हातात घेऊन नागरिकांना धमकावले जात आहे. कोयते हवेत फिरवले जात आहेत. कोयता दाखवून परिसरात दहशत निर्माण केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपळे गुरवमध्ये गल्लीत का बसलात, असे म्हणत तीन जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केले. त्यामुळे कोयता गँगचा वेळीच बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.