ज्येष्ठ रंगकर्मी राजाराम ऊर्फ राजा नाईक (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. १९५२ पासून त्यांनी प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांमधून तसेच चित्रपटांतून भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

हेही वाचा : “राज ठाकरेंवर ‘लगे रहो मुन्नाभाई’चा प्रभाव, महाराज कळले असते तर सतत भूमिका बदलल्या नसत्या आणि भोंगे शोधले नसते”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाईक यांनी ‘अंमलदार’, ‘एक शून्य रडतंय’, ‘बेबंदशाही’, ‘भोवरा’, ‘सगेसोयरे’, ‘सीमेवरून परत जा’, ’काळे बेट लाल बत्ती’ या प्रायोगिक नाटकांसह ‘श्यामची आई’, ‘कौंंतेय’, ‘ती फुलराणी’, ‘हँड्स अप’, ’सूर्यास्त’, ‘रथचक्र’, ‘सखाराम बाइंडर’, ‘ससा आणि कासव’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ ‘छू मंतर’ अशा व्यावसायिक नाटकांतून भूमिका केल्या होत्या. ‘दीड शहाणे’, ‘गडबड घोटाळा’, ‘लपवाछपवी’, ‘ठकास महाठक’, ‘भूकंप’, ‘सरकारनामा’ आणि ‘माणूस’ या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.