कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून पसार झाल्याची घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या एका सराइताविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सौरभ शिवाजी वायदंडे (वय १८, रा. भाेसले व्हिलेज, भेकराईनगर, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष किसन कुंभार (वय ४६) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यात पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राचे निरीक्षण गृह आहे. गंभीर गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलांना बालन्याय मंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात ठेवण्यात येते.

हेही वाचा – पोटनिवडणुकीसाठी कसबा मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश, आदेशाचा भंग केल्यास कारवाई

हेही वाचा – एमपीएससी परीक्षार्थींचे उद्या पुण्यात ‘अराजकीय साष्टांग दंडवत’ आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हडपसर भागात कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या सात अल्पवयीन मुलांविरोधात हडपसर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर बालन्याय मंडळाच्या आदेशाने अल्पवयीन मुलांची रवानगी पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील निरीक्षणगृहात करण्यात आली होती. अल्पवयीन मुले निरीक्षण गृहातील सीमाभिंतीवर शिडी लावून चढले. भिंतीवरून उड्या मारून पसार झाले. पसार झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करत आहेत.