पुणे : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) फलाट क्रमांक १० व ११ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी पुणे-मुंबई दरम्यानच्या अनेक गाड्या २८ ते ३१ मे कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पुढील आठवड्यात हाल होणार आहेत.

हेही वाचा >>> “पोर्श कार अपघात प्रकरणातील गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न”; पोलीस आयुक्तांनी सांगितली धक्कादायक माहिती

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटीमधील फलाट विस्तारीकरणाचे काम दीर्घकाळ चालणार आहे. हे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. आता पुणे-मुंबई दरम्यानच्या गाड्या २८ ते ३१ मे या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात २८ ते ३१ मे दरम्यान मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस आणि पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, ३१ मे रोजी पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस २९ मेपर्यंत सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंत धावणार आहे. याचबरोबर हैदराबाद- मुंबई हुसैनसागर एक्स्प्रेस आणि होस्पेट जंक्शन-मुंबई एक्स्प्रेस या गाड्या ३० मेपर्यंत सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंत धावणार आहेत. मुंबई-चेन्नई सुपरफास्ट गाडी ३० मेपर्यंत मुंबईऐवजी दादर स्थानकातून सुटेल.

हेही वाचा >>> आमदार रवींद्र धंगेकर यांचा इशारा: म्हणाले, ‘पबचालकांकडून हप्ते घेणाऱ्या ‘त्या’ तीन पोलिसांची चित्रफीत प्रसारित करणार…’

उपनगरी सेवेलाही फटका सीएसएमटीतील फलाट क्रमांक १० व ११ वर २४ डब्यांच्या गाड्यांना सामावून घेता यावे, यासाठी फलाट विस्तारीकरणाचे काम केले जात आहे. सध्या नॉन-इंटरलॉकिंगचे काम रेल्वेकडून सुरू आहेत. त्यामुळे ३० व ३१ मे रोजी ब्लॉक घेण्यात येणार असून, भायखळा ते सीएसएमटी दरम्यानच्या जलद मार्गिकांवर घेतला जाणार आहे. यामुळे भायखळा ते सीएसएमटी दरम्यानची उपनगरी सेवा ब्लॉकच्या कालावधीत बंद राहणार आहे, असे रेल्वेने कळविले आहे.