विद्यार्थिप्रिय शिक्षक, बहुभाषा कोविद, शिक्षणतज्ज्ञ, कथाकथनकार, बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष… असे साहित्य आणि शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान देणारे डाॅ. न. म. जोशी यांनी नुकतेच नव्वदीत पदार्पण केले. मराठीचा प्रचार-प्रसार व्हावा, मुलांसाठी काही उपक्रमांचे आयोजन केले जावे, यासाठी त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला तीन लाख रुपयांची देणगी दिली. अशी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणाऱ्या जोशी यांच्याशी ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.

१. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटते?

मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला, ही अतिशय अप्रतिम गोष्ट झाली. जे व्हायला हवे होते, ते उशिरा का होईना झाले, यात काहीच शंका नाही. याबद्दल मला अतिशय आनंद आणि संतोष आहे.

Nagpur 3rd grad student Kashish Thakur sang poem earning appreciation from Bhuse during inspection
जेव्हा शिक्षण मंत्र्यांना चिमूकलीने ऐकवली कविता…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
satara zilla parishad teacher Balaji Jadhav
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची पाठ्यवृत्तीसाठी निवड… राज्यातून ठरले एकमेव…
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
Ministry of Skill Development launched skill courses in local languages now available in Marathi as well
कौशल्य विकासाचे धडे आता मातृभाषेतून; एनसीडीसीकडून मराठीमध्ये सुविधा
Madhugandha Kulkarni passed Hemant dhome movie fussclass dabhade
“आपल्या मातीतल्या गोष्टी….”, मधुगंधा कुलकर्णीने ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचं केलं कौतुक; म्हणाली, “‘ॲनिमल’, ‘पुष्पा’ असे…”
Teachers unions oppose State Boards decisions with headmasters questioning IAS officers
शिक्षण मंडळाच्या सर्व परीक्षांवर बहिष्कार, आयएएस अधिकाऱ्यांना परीक्षा समजतात काय? शिक्षकांचा थेट सवाल…
For one year EWS certificates not in prescribed format will be accepted as special case
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, विशेष बाब म्हणून प्रवेश ग्राह्य धरण्याच्या सूचना

२. हा दर्जा वाढविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी मराठीतील लेखक, वाचक आणि प्रकाशकांनी कोणती जबाबदारी स्वीकारायला हवी?

अभिजात दर्जा मिळाल्यामुळे केंद्र शासनाकडून शे-पाचशे कोटी अनुदान आपल्याला मिळेल. त्याचा उपयोग मराठीचा प्रसार आणि लोकांमध्ये भाषेची आवड निर्माण होण्यासाठी कृतिशील उपक्रमासाठी व्हावा. इमारती, नेमणुका, बैठका, परिसंवाद, ग्रंथप्रकाशने या सगळ्यांसाठी या अनुदानातील केवळ २० टक्के रक्कम खर्च करावी. उर्वरित ८० टक्के रक्कम ही केवळ मराठीचे कृती कार्यक्रम म्हणजे लोकांमध्ये मराठी बोलण्याची आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी खर्च व्हावेत. शाळा-शाळांमधून पुस्तक पेटीसारखे उपक्रम सुरू करायला हवेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतदेखील मराठी कसे बोलतील आणि वाचतील यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये रिकाम्या तासाच्या वेळी मराठीतील सोपी पुस्तकं मुलांना वाचायला द्यावीत. त्या पुस्तकांमधून मुलांनी वाचलेले काय आहे, ते शिक्षकांनी समजून घ्यायला हवे. या उपक्रमांत अनेक शिक्षकांचा सहभाग घेता येऊ शकतो. तसेच मुलांना चांगल्या गोष्टी सांगूनही मराठीची आवड निर्माण करता येऊ शकते. श्रवण, वाचन, भाषण, लेखन या चारही पातळ्यांवर मराठीची आवड निर्माण होईल, असे उपक्रम राबवले जावेत.

हेही वाचा >>>लष्करप्रमुखांकडून पुण्याचा गौरव, म्हणाले, लष्करासाठी पुणे ‘पॉवर हाउस’

३. वयाच्या नव्वदीत साहित्य विश्वाकडे पाहताना काय वाटते?

मराठी साहित्यविश्वात उत्सवी कार्यक्रमांना बरकत आहे. ग्रंथप्रदर्शने, चर्चासत्र, उत्सव, मेळावे, उद्घाटने, समारोप आणि तोंडी लावायला अर्धसांस्कृतिक चर्चा आणि परिसंवाद असे कार्यक्रम होतात. मुख्य म्हणजे अशा कार्यक्रमांना श्रोत्यांची उपस्थिती कमी असते, पण अशा उत्सवी कार्यक्रमांची प्रसिद्धी आवर्जून मोठ्या प्रमाणात केली जाते. साहित्य संमेलन आणि उत्सवी कार्यक्रम असलेच पाहिजेत; पण या उत्सवी कार्यक्रमांच्या बरोबरीने कृतिशील कार्यक्रमदेखील मोठ्या प्रमाणात व्हावेत.

उत्सवी कार्यक्रम हे सार्वजनिक नळकोंडाळ्यासारखे असतात. नळकोंडाळ्यावर जसा नळ सुटलेला असतो, तेथे कोणी तरी पाणी भरते, काही जण धुणं धुतात, तर काही जण आंघोळीलाही येतात. तेथे भांडणे होतात, समझोते होतात आणि गप्पाही होतात; पण ज्या वेळी तेथे कोणी नसते, त्या वेळी तो नळ सुटलेलाच असतो. अशा सार्वजनिक नळकोंडाळ्यासारख्या कार्यक्रमाच्या बरोबरीने अभिषेक पात्रासारख्या कार्यक्रमांचीदेखील गरज आहे. ज्यातून प्रत्यक्ष धार त्या सांबाच्या पिंडीवर पडेल आणि त्याचे रूपांतर प्रत्यक्ष तीर्थात होऊन लोक ते प्राशन करतील. तीर्थाचा जसा एकही थेंब वाया जात नाही, तसे समन्वयातून कृतिशील कार्यक्रमही अधिक झाले पाहिजेत. आज ८० टक्के कार्यक्रम हे या नळकोंडाळ्यांसारखे आहेत, तर अभिषेक पात्रासारखे कार्यक्रम फार थोडे आहेत. ज्यांना नळकोंडाळ्यावर जायचे आहे, त्यांना जाऊद्या. अशा कार्यक्रमांना विरोध अजिबात नाही, पण आपले अशाच कार्यक्रमांकडे लक्ष जास्त आहे. कृती कार्यक्रमांकडे लक्ष नाही. ते वाढले पाहिजे पाहिजेत.

हेही वाचा >>>पिंपरी: पाच एकर जमीन विकून जुगारात हारला; ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी

४. एक लेखक म्हणून कारकिर्द कशी बहरली? कोणकोणत्या प्रकारचे लेखन केले?

चरित्रलेखनकार आणि बोधकथाकार म्हणून माझी कारकिर्द बहरली. माझी ओळख ही बोधकथाकार अशीच आहे. मी अनेक वृत्तपत्रांमधून वर्षभर बोधकथा लिहीत असे, त्या लिहिताना मी सर्वसामान्यांच्या जीवनातील प्रसंग हेरून त्यावर कथा लिहिल्या. ज्यातून अनेकांना सकारात्मक ऊर्जा मिळालेली आहे. लेखनाद्वारे विविध ठिकाणचे वाचक जोडले गेले. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे वाचनसंस्कृती अजूनही टिकून आहे, याचा आनंद आहे. त्यामुळे भावी काळातही चरित्रात्मक कादंबरीलेखन करणार आहे.

shriram.oak@expressindia.com

Story img Loader