scorecardresearch

पुणे : स्वागरगेटजवळ एसटी बसचा ब्रेक फेल; अनेक वाहनांना दिली धडक, सुदैवाने जिवीतहानी नाही

काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

bus accident
सकाळी अकरा साडेअकराच्या सुमारास घडली ही घटना

पुण्यातील स्वारगेट येथील शंकर महाराज पुलावर राज्य परिवहन मंडळाच्या बसचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडली आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने सात ते आठ वाहनांना धडक दिली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असली तरी सुदैवाने जिवितहानी झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ ते साडेअकराच्या सुमारास शंकर महाराज पुलावर सातारा ते स्वारगेट मार्गावरील एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. ब्रेक फेल झाल्याने या बसने सात ते आठ वाहनांना धडक दिली. यामध्ये काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे स्वागरगेटमधील शंकर महाराज पुलाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने,नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे लागले. या प्रकरणाचा महामंडळाकडून तपास केला जाणार असल्याचं सांगितलं जातंय.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: St bus break failed near swargate svk 88 scsg

ताज्या बातम्या