भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या महिला मेळाव्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. या मेळाव्या दरम्यान अजित गव्हाणे हे नक्कीच आमदार होतील. असं म्हणत असतानाच ‘अजित भाऊ’ हा उल्लेख घेणे टाळले. सुप्रिया सुळेंनी अजित दामोदर गव्हाणे असा उल्लेख केला.

अजित भाऊ म्हणलं तर माझं भाषण काटछाट करतील. असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या अजित पवारांच्या समर्थकांना आणि अजित पवारांना सुळे यांनी टोला लगावला आहे.

हेही वाचा…Raj Thackeray: ‘मी सामान्य राजकारणी नाही, मला इतरांप्रमाणे समजू नका’, एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर राज ठाकरेंचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सध्याचा उत्साह पाहून अजित गव्हाणे हे आमदारकीचं 23 तारखेला सर्टिफिकेट घेतील. याबाबत कोणालाही चिंता वाटत नाही.” हे बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा अजित गव्हाणे यांचा उल्लेख करत असताना ‘अजित दामोदर गव्हाणे’ असं पूर्ण नाव घेऊन आमदारकीचं सर्टिफिकेट त्यांना मिळणार असल्याचं उल्लेख केला. पुढे त्या म्हणाल्या, आजकाल भाषण करताना खूप काळजी घ्यावी लागते. अजित भाऊ यांना आमदारकीचं सर्टिफिकेट मिळणार असं म्हटल्यावर माझ्या पोटात गोळा आला. याचं ट्रोलिंग होऊ शकतं, कारण काहीजण या वाक्यातून काटछाट करू शकतात. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसह त्यांच्या समर्थकांना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला आहे. कोण कुठलं भाषण कुठे वापरेल याबाबत शासंका आहे. अस त्यांनी नमूद केलं. सुप्रिया सुळे या भोसरी विधानसभेत अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात बोलत होत्या.