पुण्यातील धनकवडी भागातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील खंडाळा परिसरात नदीत सापडला. सहकारनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहेत. नेहा शरद पिलाणे (वय २०, रा. जयनाथ चौक, धनकवडी, मूळ रा. वांगणी, ता. वेल्हे) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीचे नाव आहे.

हेही वाचा- पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर तरुणाचा खून; पोलिसांनी केली तिघांना अटक

नेहा १३ जानेवारी रोजी राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. नेहाचा मृतदेह १५ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा परिसरातील नीरा नदीपात्रात सापडली. नदीत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी ओळख पटवली. दरम्यान, नेहा बेपत्ता कशी झाली तसेच तिने आत्महत्या केली किंवा घातपात आहे का?, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अशी माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.