लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: माहेरी आलेल्या विवाहित बहिणीला ताप आल्यानंतर भावाने तिला रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे उघड झाले. डॉक्टरांनी तिची चौकशी केली. तेव्हा युवती अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. युवतीचा बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिचा विवाह लावून देणाऱ्या आई-वडिलांसह पतीच्या विरुद्ध सातारा परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित गुन्हा तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

आणखी वाचा- अवकाळीमुळे पिकांची नासाडी,एक लाख ३९ हजार हेक्टरवर नुकसान, २५ जिल्ह्यांना फटका

सात मार्च रोजी ती सातारा येथे माहेरी गेली होती. तिला ताप आल्याने भावाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा युवतीचे वय १७ वर्षे असल्याचे समजले. त्यानंतर डॉक्टरांनी या घटनेची माहिती सातारा पोलिसांना दिली. त्यानंतर अल्पवयीन युवतीचा विवाह लावून देणारे आई-वडील तसेच पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The child marriage of a pregnant girl was revealed after admitted to the hospital for treatment pune print news rbk 25 mrj
First published on: 21-03-2023 at 10:43 IST