नारायणगाव : गणेशोत्सव विसर्जन आणि पैगंबर जयंती (ईद ए मिलाद) एकाच दिवशी येत असल्याने नारायणगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर रोजी जुलूस मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी ही माहिती दिली. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुस्लिम समाजाचे पदाधिकारी आणि बांधवांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

नारायणगाव जामा मस्जिदचे विश्वस्त एजाज आत्तार, सिद्धिक शेख, हाजी नूर महंमद मणियार, सलीम मोमीन, अखलाक आत्तार, राजे ग्रुपचे अध्यक्ष जुबेर शेख, दादामिया पटेल ,पोलीस उप निरीक्षक सानील धनवे, दत्ता ढेंबरे यांच्यासह वडगाव कांदळी, हिवरे, नारायणगाव, खोडद, निमगाव सावा, पारगाव, आळे,वडगाव कांदळी, येडगाव, आर्वी, पिंपळगाव गावातील मस्जीद अध्यक्ष, मौलाना, सदस्य या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांवर पोलिसांचा सौम्य लाठी हल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नारायणगाव जामा मस्जिदचे विश्वस्त एजाज आत्तार म्हणाले की, पोलीस प्रशासनावर ताण येऊ नयम्या सामाजिक भावनेतून नारायणगाव आणि परिसरातील मुस्लिम बांधव २८ सप्टेबर रोजी मोहम्मद पैगंबर जयंती मशीदीमध्येच  साजरी करतील. जुलूस आणि इतर धार्मिक कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी होणार आहेत. महादेव शेलार म्हणाले की, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुस्लिम बांधवानी हिंदू आणि मुस्लिम ऐक्य आबाधित राहुन समाजामध्ये धर्मनिरपेक्षता आणि एकात्मतेची भावना वृद्धिंगत होण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेऊन प्रशासनाला सहकार्य केले आहे.