मार्केट यार्डातील घाऊक बाजारात टोमॅटो, काकडी, फ्लाॅवर या फळभाज्यांच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२९ जानेवारी) राज्य; तसेच परराज्यांतून १०० ते ११० ट्रक फळभ्जयांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, राजस्थानातून ९ ते १० टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून मिळून १५ टेम्पो मटार, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, बंगळुरुतून ३ टेम्पो आले, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ९ ते १० ट्रक लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ४० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे : हाॅटेल व्यावसायिकाकडे दोन लाखांची खंडणी मागणारे गजाआड

पुणे विभागातून सातारी आले ११०० ते १२०० गोणी, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा २ ते ३ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कांदा १०० ट्रक अशी आवक झाली.

अंबाडी, पालकाच्या दरात वाढ
मार्केट यार्डातील तरकारी विभागात अंबाडी आणि पालक या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. चाकवत, राजगिऱ्याच्या दरात घट झाली असून मेथी, शेपू, चाकवत, राजगिरा, मुळा, चुका, हरभरा गड्डीचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या एक लाख जुडींची आवक झाली. मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात अंबाडीच्या दरात १ रुपयांनी तसेच पालकाच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली आहे. चाकवत, राजगिऱ्याच्या दरात जुडीमागे १ रुपयांनी घट झाली.

हेही वाचा >>>जगताप कुटुंबीयांचा उमेदवार असल्यास तुमचा उमेदवार उभा करू नका; भाजपाकडून पत्राद्वारे विरोधकांना आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिंबू, कलिंगड, खरबुजच्या दरात घट
मार्केट यार्डातील फळबाजारात कलिंगड, खरबूज, लिंबांच्या दरात घट झाली असून बोरांच्या दरात वाढ झाली आहे. संत्री, माेसंबी, अननस, सफरचंद, पपई, चिकूचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात लिंबू २ ते अडीच हजार गोणी, अननस ६ ट्रक, डाळिंब २० ते २५ टन, मोसंबी ४० ते ५० टन, संत्री ३५ ते ४० टन, बोरे ४०० गोणी, चिकू १ गोणी, कलिंगड ८ ते १० टेम्पो, खरबूज ८ ते १० टेम्पो, पपई ७ ते ८ टेम्पो, सफरचंद २ ते अडीच हजार पेटी अशी आवक झाली.