लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) नवीन कार्यकारिणी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रिपाइंच्या अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार आहे.

रिपाइंचे माजी अध्यक्ष अशोक शिरोळे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली. माजी अध्यक्ष अशोक कांबळे आणि श्याम सदाफुले या वेळी उपस्थित होते. रिपाइंच्या पुनर्बांधणीसाठी शहरात नवीन अध्यक्ष आणि नवीन कार्यकारिणी नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संजय सोनावणे, शैलेंद्र चव्हाण, तसेच हबीब सय्यद अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. रिपाइंच्या सभासद नोंदणीची प्रक्रियाही २१ जूनपासून सुरू करण्यात आली असून, अंतिम मुदत २५ जुलै आहे. उमेदवारांना येत्या १९ जुलै रोजी चिन्हवाटप केले जाणार असून, याच दिवशी मतदारयाद्या जाहीर करण्यात येतील. सहा ऑगस्ट रोजी मतदान होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा.. आषाढी एकादशीनिमित्त पुण्यात गुरूवारी नियमित पाणीपुरवठा

दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्य सचिव बाळासाहेब जानराव, राज्य उपाध्यक्ष असित गांगुर्डे, माजी शहराध्यक्ष अशोक कांबळे, अशोक शिरोळे व श्याम सदाफुले यांची निवड करण्यात आली आहे.