scorecardresearch

Premium

‘रिपाइं’च्या शहराध्यक्षपदासाठी चुरस; ‘हे’ उमेदवार इच्छुक

संजय सोनावणे, शैलेंद्र चव्हाण, तसेच हबीब सय्यद अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

appointing new executive republican party india started candidates interested pune
‘रिपाइं’च्या शहराक्षपदासाठी चुरस; 'हे' उमेदवार इच्छुक (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) नवीन कार्यकारिणी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रिपाइंच्या अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार आहे.

Ajit Gavane on ajit pawar
पिंपरी : चंद्रकांत पाटलांपेक्षा अजित पवार अधिक चांगलं काम करतील – अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे
ajit pawar name omitted from chargesheet
“निवडणूक आयोगाचा निर्णय…”, अध्यक्षपदाच्या निवडीवरून अजित पवारांचं विधान
Who developed Pimpri Chinchwad
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास कोणी केला? शरद पवार की अजित पवार? दोन्ही गटाचे शहराध्यक्ष म्हणाले…
Rajnish Seths
एमपीएससीच्या अध्यक्षपदासाठी रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर?

रिपाइंचे माजी अध्यक्ष अशोक शिरोळे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली. माजी अध्यक्ष अशोक कांबळे आणि श्याम सदाफुले या वेळी उपस्थित होते. रिपाइंच्या पुनर्बांधणीसाठी शहरात नवीन अध्यक्ष आणि नवीन कार्यकारिणी नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संजय सोनावणे, शैलेंद्र चव्हाण, तसेच हबीब सय्यद अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. रिपाइंच्या सभासद नोंदणीची प्रक्रियाही २१ जूनपासून सुरू करण्यात आली असून, अंतिम मुदत २५ जुलै आहे. उमेदवारांना येत्या १९ जुलै रोजी चिन्हवाटप केले जाणार असून, याच दिवशी मतदारयाद्या जाहीर करण्यात येतील. सहा ऑगस्ट रोजी मतदान होईल.

हेही वाचा.. आषाढी एकादशीनिमित्त पुण्यात गुरूवारी नियमित पाणीपुरवठा

दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्य सचिव बाळासाहेब जानराव, राज्य उपाध्यक्ष असित गांगुर्डे, माजी शहराध्यक्ष अशोक कांबळे, अशोक शिरोळे व श्याम सदाफुले यांची निवड करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The process of appointing the new executive of the republican party of india athawale group has started and some candidates are interested pune print news apk 13 dvr

First published on: 24-06-2023 at 14:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×