पुणे: जेवण तयार न केल्याने महिलेला बेदम मारहाण करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली.

मधुरा तानाजी कांबळे (वय ४२, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती तानाजी शिवाजी कांबळे (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मुलगा पियूष तानाजी कांबळे (वय १९) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तानाजी मजूरी करतो. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. रात्री दहाच्या सुमारास तो घरी आला. जेवण तयार न झाल्याने तो पत्नी मधुरा यांच्यावर चिडला. त्याने पत्नीला लाथबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत मधुरा गंभीर जखमी झाल्या.

mandira bedi talks about adopted daughter
“कधीही कारमध्ये न बसलेल्या मुलीने थेट प्रायव्हेट जेटने…”, दत्तक मुलीबद्दल काय म्हणाली मंदिरा बेदी?
biker on his way to a wedding got his throat slit by a Chinese manja
धक्कादायक! लग्नाला जात असलेल्या एका दुचाकीस्वाराचा चिनी मांजाने गळा चिरला
Saurabh Netrawalkar Statement on Suryakumar Yadav Dropped Catch
IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’
Nagpur, Nagpur Love Triangle case, dispute in love, Friends Clash Leading to Brutal Murder, murder in Nagpur, murder news, Nagpur news,
प्रेयसीला मित्राने केला प्रपोज, युवक संतापला अन् नंतर जे घडलं ते…
Sunil Lahri disappointed on faizabad loksbha result
“अयोध्येतील नागरिकांनी आपल्या खऱ्या राजाचा…”, भाजपा उमेदवार हरल्याने ‘रामायण’मधील लक्ष्मणची नाराजी, स्वार्थी हिंदू म्हणत केली टीका
lokmanas
लोकमानस: ‘मेंढरू’ होणे नाकारणाऱ्यांचे यश
Crime in karnataka
चाकू हल्ला करत शीर केलं धडावेगळं, नंतर कातडीही सोलली, जेवण वाढलं नाही म्हणून पतीने केली पत्नीची क्रूर हत्या
prithviraj chavan
“मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना आता…”; गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून पृथ्वीराज चव्हाणांची खोचक टीका!

हेही वाचा… नाताळानिमित्त लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या काय होणार…

बेशुद्धावस्थेतील मधुरा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्याप्रकरणी तानाजीला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.