इंदापूर : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवणजवळ मोटार आणि मालमोटार यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास झाला.

बाबासाहेब धेंडे (वय ४८, रा. जोतीबाचीवाडी, ता.बार्शी). राजू मस्के (वय ५२) राधिका अजय मस्के (वय २२, रा. दोघेही अजिंठा नगर पिंपरी चिंचवड) हे मृत्यूमुखी पडले. अजय राजू मस्के (वय २६) काजल राजू मस्के (वय २३) हे गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा – ‘जेईई मेन्स’चा निकाल जाहीर, राज्यातील किती विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल?

हेही वाचा – पुण्यात पोलिसांकडून घृणास्पद प्रकार : पोलीस चौकीत महिलेला बेदम मारहाण, पिण्यास पाणी मागितले, तर लघुशंका प्यायला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रावणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्के कुटुंबीय हे सोलापूरला मोटारीतून निघाले होते. त्यांची मोटार ही भिगवण येथील स्वामी चिंचोली गावाजवळ आली असता, सोलापूरकडे निघालेल्या मालमोटारीची पाठीमागून जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी भिगवण, रावणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस आणि महामार्ग पोलीस तातडीने पोहोचले. त्यांनी मदत कार्य सुरू केले. अधिक तपास रावणगाव पोलीस करीत आहेत.