पुणे : दुबईहून तस्करी करून आणलेले सहा किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले. सोने तस्करी प्रकरणात एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली.

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला येणार असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या (डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने विमानतळावर सापळा लावला. विमानतळावर महिला साथीदारासह उतरली. गडबडीत महिला आणि तिच्याबरोबर असलेला साथीदार विमानतळातून बाहेर पडण्याचा प्रयत्नात होते. डीआरआयच्या पथकाने दोघांची संशयावरुन चौकशी सुरू केली. त्यांची तपासणी करण्यात आली. सहा किलो ९१२ सोन्याची भुकटी पट्टा आणि पाकिटात लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. दोघांकडून सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली.

pune airport latest marathi news
पुणे ठरले उणे! आंतरराष्ट्रीय उड्डाणात छोट्या शहरांनीही टाकले मागे; जाणून घ्या स्थान…
IndiGo flights delayed after system crashes
पुणे विमानतळावर प्रवाशांचे हाल संपेनात! इंडिगोच्या यंत्रणेतील बिघाडाने उड्डाणाला तीन तासांचा विलंब
pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
Mumbai airport, Take-off and landing,
महत्त्वाचे : मुंबई विमानतळावर ९ मे ला टेकऑफ – लँडिंग तब्बल सहा तास बंद रहाणार, वाचा सविस्तर…

हेही वाचा…गुंड गजानन मारणे, पार्थ पवार भेटीवर अजित पवार म्हणाले, “अतिशय चुकीची…”

याप्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय सीमाशुल्क कायद्यान्वये (कस्टम ॲक्ट) गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांची न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आली आहे, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. चार दिवसांपूर्वी कस्टमच्या पथकाने पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून ७३ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.