पुणे : दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ लाख ८० हजार रुपयांच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधित आरोपीने हडपसर परिसरातून चार आणि सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा पाच दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वाहन चोरी रोखण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे युनिट पाचचे पथक हद्दीत गस्त घालत होते. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या आदेशान्वये कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंध पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने विधी संघर्षित बालकाला त्याच्या पालकासह युनिट कार्यालयात आणून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशीत त्याने वाहन चोरीच्या पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार राजस शेख, शहाजी काळे, प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, विनोद शिवले, विनोद निंभोरे, अमित कांबळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे, महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे, स्वाती तुपे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली.