सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील संस्थाचालक गटात बिनविरोध निवड झाली. विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्यांदाच बिनविरोध निवड झाली असून, विद्यापीठ विकास मंचाच्या उमेदवारांची निवड झाली.

हेही वाचा- ‘बायोमॅट्रिक्स हजेरी नाही, तर वेतन नाही’; पुणे पालिका कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा बायोमॅट्रिक्स हजेरी

विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. संस्थाचालक, प्राचार्य, पदवीधर अशा विविध गटांसाठी निवडणूक होत आहे. त्यातही पदवीधर निवडणुकीत राजकीय पक्षांची पॅनेल उतरल्याने ही निवडणूक चुरशीची आणि लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. संस्थाचालक प्रतिनिधी गटातून सहा जागांसाठी अधिसभा सदस्यपदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. सहा जागांपैकी चार खुला वर्ग, प्रत्येकी एक जागा महिला आणि एसटी प्रवर्गासाठी आरक्षित होती. सहा जागांसाठी दहा उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यानंतर कुलगुरूंनी घेतलेल्या अंतिम निर्णयात आणखी दोन अर्ज वैध ठरले. एसटी प्रवर्गासाठी एकही अर्ज नव्हता. त्यामुळे ही जागा रिक्त राहिली. पाच जागांसाठी अर्ज माघारीचा रविवार हा शेवटचा दिवस होता. त्यात अखेरच्या क्षणी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदमसह अन्य उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.

हेही वाचा- पुणे: महापालिकेच्या पाच सहाय्यक आयुक्तांना नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संस्थाचालक गटातील निवडणुकीचे चित्र रविवारी स्पष्ट झाले. संस्थाचालक गटात एकूण सहा जागा होत्या. त्यात पाच जागांवर विद्यापीठ विकास मंचाच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली खुल्या गटातून डॉ. राजेंद्र विखे-पाटील, डॉ. अपूर्व हिरे, प्रा. विनायक आंबेकर, अशोक सावंत यांची, तर महिला गटात डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटात बिनविरोध निवडणूक झाल्याची माहिती विद्यापीठ विकास मंचाचे समन्वयक राजेश पांडे यांनी दिली.