पुणे : शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलिसांना बनावट कागदपत्रे सादर करून परवाना मिळवल्याप्रकरणी वैष्णवी हगवणे यांचा पती शशांक आणि दीर सुशील हगवणे विरोधात रात्री उशिरा वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाल्यानंतर हगवणे बंधूंविरोधात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. याबाबत कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी फिर्यादी दिली आहे.

हगवणे बंधूंनी शस्त्र परवाने मिळवण्यासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी तपासणी प्रक्रियेत खोटी माहिती दिली होती. या खोट्या माहितीनंतर त्याला शस्त्र परवाना मिळाला होता. शस्त्र परवाना मिळवताना दोघांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर माहितीची शहानिशा करण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

पती शशांक, दीर सुशील, तसेच निलेश चव्हाण यांनी २०२२ मध्ये पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाने मिळविले होते. तिघांचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून, त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शशांक आणि सुशील हगवणे यांनी पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुण्यातील निवासाचा पत्ता दिला. या दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यात शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केले होते. वास्तव्याचा पुरावा म्हणून दोघांनी भाडेकरार शस्त्र परवान्यासाठी पोलिसांना दिल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे.