कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी मतदारसंघातील काही भागांमध्ये मतदान पावती मतदारांपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे मतदारयादीत नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यादीत नाव असलेल्या मतदानाचा हक्क बजावला. तर यादीत नाव नसलेले मतदार मतदानापासून वंचित राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Kasba By Poll : रूपाली ठोंबरेंच्या फेसबुकवर मतदान करतानाचा फोटो पोस्ट! रुपालीताई म्हणतात “मी मतदान…”

निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदाराला मतदान दिवसाच्या आधी मतदार पावती पाठवली जाते. या मतदार पावतीमध्ये मतदाराचे मतदारसंघातील मतदान केंद्र, मतदार ओळखपत्र क्रमांक, मतदान खोली क्रमांक आदी तपशील असतो. मात्र कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी मतदारसंघातील काही भागात मतदार पावती मतदारांपर्यंत पोहोचलीच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांनी आपले नाव मतदान यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी हे तपासण्यासाठी थेट मतदार केंद्रच गाठले.

हेही वाचा- Chinchwad Constituency By-Election : चिंचवडमध्ये तीन ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड; ‘मॉकपोल’ दरम्यान आठ मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड

काही मतदार केंद्रांवर मतदारांनी नाव पाहण्यासाठी गर्दी केल्याचे आढळून आले. मतदार यादीत नाव असल्याचे तपासून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर काही ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याने मतदारांना मतदान करता आले नाही. काही मतदार याद्यांमध्ये मयतांची नावे असल्याचे दिसून आले.

हेही वाचा- Kasba, Chinchwad Bypolls: लंडनहून थेट कसब्यातील मतदान केंद्रावरच!

मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाचा अधिकार बजावता न आल्याबाबत अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. मतदार याद्या अद्यावत केल्याचे सांगण्यात आल्यानंतरही मतदार यादीत नाव नसण्याचा प्रकार घडला. त्यामुळे काही मतदारांना दोन-तीन केंद्रांवर फिरून नाव आहे का याची चौकशी करावी लागली. पण यादीत नाव नसल्याने नाईलाजाने मतदान न करता काही मतदारांना घरी जावे लागले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voters crowd to check their name in the voter list during the kasba by election pune print news psg 17 dpj
First published on: 26-02-2023 at 13:37 IST