पिंपरी- चिंचवड : प्रेयसीच दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून प्रियकराने तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दिलावर सिंग नावाच्या पंचवीस वर्षीय प्रियकराला अटक केली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलावर सिंगच २०१९ पासून रीना (नाव बदलेल आहे) सोबत प्रेमसंबंध होते. परंतु, रीनाच इतर व्यक्तीसोबत प्रेम संबंध असल्याचा संशय आरोपी दिलावर याला होता. रीना तिच्या दुसऱ्या प्रियकरा सोबत विवाह करणार होती. याबाबतची कुणकुण आरोपी दिलावर याला लागली होती. आज (शनिवार) रीनाला पिंपरी- चिंचवडमधील काळा खडक येथे असलेल्या लॉजवर आणलं. तिथे प्रेयसी रीनाचा मोबाईल तपासला.
मोबाईलमध्ये रीना आणि दुसऱ्या प्रियकराचे नग्न फोटो आढळले. चिडलेल्या दिलावरने प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून हत्या केली. हत्या करून थेट कोंढवा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना हत्या केल्याची माहिती देण्यात आली. हत्या केल्याचं कबूल केलं. कोंढवा पोलिसांनी याबाबतची माहिती वाकड पोलिसांना दिली. वाकड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर प्रेयसीची हत्या केल्याचं समोर आलं. या घटने प्रकरण आरोपी दिलावर सिंगला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.