पुणे हे शहराचे नाव ज्यावरून पडले ते पुण्येश्वर मंदिर आणि या मंदिराच्या जागेवरील मशीद हे सध्या हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. मात्र, उच्च न्यायालयामध्ये स्थगिती आदेश मिळालेला असतानाही वक्फ बोर्डाच्या माध्यमातून या जागेवर बहुमजली बांधकाम करण्याचा घाट घातला जात आहे. पुण्येश्वर मंदिर आणि मशिदीची जागा ‘जैसे थे’ ठेवावी. तेथे बांधकामाला परवानगी देऊन नवीन वाद निर्माण करू नयेत, अशी मागणी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस पांडुरंग बकलवडे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुण्यातील भाषणात अजित पवारांची तुफान फटकेबाजी, कुत्र्यांच्या नसबंदीवरून भाजपावर टीकास्र; म्हणाले, “यांची अक्कल कुठं…”

‘कसबा हिंदुत्वाचा आहे. ही लढाई दोन उमेदवारांमधील नाही तर विचारधारांमधील आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवाराने आणि महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनी पुण्येश्वर महादेवाबाबतची भूमिका स्पष्ट करावी’, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत केली होती. तर, शनिवारवाडा परिसरातील पुण्येश्वर मंदिर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरात उत्खनन करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर उभारण्यात आलेल्या दर्ग्याच्या प्रस्तावित बांधकामास परवानगी देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार देत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. या पार्श्वभूमीवर बकलवडे यांनी पुण्येश्वर मंदिराच्या इतिहासाबाबत प्रकाशझोत टाकला.

हेही वाचा >>>पुणे: कर्वे रस्त्यावर ‘मोक्का’ लावलेल्या सराईत गुन्हेगाराचा खून

बलकवडे म्हणाले, ब्रिटिशांच्या १८८७ च्या पुणे जिल्हा गॅझेटियरमध्ये ‘पुण्यामध्ये पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही पुरातन मंदिरे होती. या मंदिरांचा विद्धंस करून त्या जागेवर मशीद आणि दर्गा उभारला (थोरला शेखसल्ला व धाकटा शेखसल्ला) गेला आहे’, असा स्पष्ट उल्लेख आहे. शेख सल्लाउद्दीन जंजानी शेख इसामुद्दीन हे १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीवर स्वारी केली. यादवांचे राज्य जिंकून घेतल्यावर खिलजी पुण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the exact history of punyeshwar temple which is being discussed in the kasba by election pune print news vvk 10 amy
First published on: 24-02-2023 at 18:10 IST