मिनीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. या प्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा वीरकर (रा. वीरकर मळा, लोणी काळभोर) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सुजाता सावंत (वय ५०) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- पुणे : पाषाण परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

सुजाता आणि मनीषा नणंद-भावजय आहेत. जमिनीच्या वादातून सुजाताने मनीषा यांना काठीने मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड मारला. या घटनेत मनीषा गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.