पिंपरी – चिंचवड : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण नुकतंच घडलेलं असताना आता आणखी एक हुंडा बळी गेल्याच समोर आलं आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय किरण आशिष दामोदर हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लग्नाच्या सहा महिन्यानंतर आरोपी आशिषने सासरी दुचाकी आणि हुंडा म्हणून पाच लाखांची मागणी केली होती. या प्रकरणी आशिष दीपक दामोदर ला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृत किरण चे वडील संजय हरिभाऊ दोड यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
१८ जुलै रोजी किरण आशिष दामोदर हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. किरण आणि आशिष चा जून २०२२ मध्ये रितिरिवाजाप्रमाणे मोठ्या थाटात विवाह झाला. विवाह ला सहा महिने होताच जावई आशिष ने सासरच्या मंडळींकडे पाच लाखांचा हुंडा आणि एक दुचाकी साठी तगादा लावला. तरीही जावायच्या हट्टापायी मुलीला एक मोपेड दुचाकी घेऊन दिली. याच दरम्यान दोघांना गोंडस मुलगा झाला.
संसार सुरळीत होईल असं वाटत होतं. परंतु, आरोपी आशिष, किरण ला मद्यपान करून मारहाण करायचा. वारंवार सासरच्या मंडळींकडे पैशांसाठी तगादा लावायचा. सासरे अधून- मधून पैसे देत होते.
आतापर्यंत पाच लाखाहून अधिक रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. सासू सुनंदा दीपक दामोदर ही देखील किरण ला लग्नात काही दिल नसल्याने टोमणे मारायची. हे सर्व किरण ने घरी फोन करून सांगितलं होतं. आई वडिलांनी पिंपरी- चिंचवडमध्ये येऊन किरणची भेट घेतली होती. परत घरी चल अस ही म्हटल होत. तरीही किरण माहेरी गेली नाही. १८ जुलै रोजी आरोपी आशिष चा वाढदिवस होता. याच दरम्यान दोघांमध्ये केक वाटण्यावरून वाद झाला आणि रूममध्ये जाऊन किरणने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पत्नीला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं, परंतु तिथं मृत घोषित करण्यात आलं. आत्महत्येनंतर पोलिसांनी माहेरच्या व्यक्तींना याबाबत माहिती दिली होती. गळफास घेतलेल्या दिवशी वडिलांना फोन करून आशिष खूप मानसिक त्रास देत असल्याचे सांगत किरण ने फोन ठेऊन दिला होता. अखेर याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आशिष ला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.