विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; संकेतस्थळावरील ओळखीतून तरुणीची १४ लाखांची फसवणूक

विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एकाने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; संकेतस्थळावरील ओळखीतून तरुणीची १४ लाखांची फसवणूक
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एकाने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीची १४ लाख रुपयांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शंतनू गंगाधर महाजन (वय २८, रा. रिव्हरडेल सोसायटी, खराडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीने विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपी शंतुनने सुद्धा संकेतस्थळावर नोंदणी केली होती. शंतनूने तरुणीशी संपर्क साधून तिच्याशी विवाह करण्यासाठी उत्सुक असल्याचे आमिष दाखविले. त्यानंतर दोघांची ओळख झाली.

त्याने तरुणीला एका हॅाटेलमध्ये भेटण्यासाठी जून महिन्यात बोलाविले. त्यानंतर त्याने तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले. त्या वेळी त्याने तरुणीचा मोबाइल क्रमांकामधील बँक खात्याची गोपनीय माहिती, छायाचित्र तसेच अन्य माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन शंतनुने तरुणीच्या नावावर १४ लाख रुपयांचे कर्ज घेतले. तरुणीच्या खात्यात जमा झालेली कर्जाची रक्कम त्याने परस्पर स्वत:च्या खात्यात वर्ग करुन घेतली. तरुणीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman raped under lure of marriage 14 lakh fraud pune print news rmm

Next Story
भाजपच्या सत्ताकाळातील महत्त्वपूर्ण प्रकल्प रखडले – पिंपरीतील भाजप नेत्यांची आयुक्तांकडे तक्रार
फोटो गॅलरी