scorecardresearch

VIDEO: वाह रे पठ्ठ्या! पिंपरी चिंचवडमध्ये १० वर्षीय पहिलवानाने एका दमात मारले १,००० जोर

पिंपरी-चिंचवडमध्ये अवघ्या १० वर्षीय पहिलवानाने एका दमात १ हजार जोर मारून सर्वांनाच अवाक केलं आहे.

Pimpri Chinchwad Wrestler

पिंपरी-चिंचवडमध्ये अवघ्या १० वर्षीय पहिलवानाने एका दमात १ हजार जोर मारून सर्वांनाच अवाक केलं आहे. त्याने २६ मिनिटं ५१ सेकंदात एक हजार जोर मारले आहेत. स्वराज राहुल लांडगे असं या १० वर्षीय पहिलवानाचे नाव आहे. असा विक्रम करणारा स्वराज पहिलाच असल्याचा दावा स्वराजचे वडील राहुल लांडगे यांनी केलाय. स्वराजचा एका दमात एक हजार जोर मारण्याचा संकल्प होता. त्याचा कार्यक्रम रविवारी (२३ मे) पार पडला. यावेळी हिंद केसरी महाराष्ट्र अमोल बुचडे, पहिलवान आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते.

दहा वर्षीय स्वराज लांडगे याने एका दमात एक हजार जोर मारण्याचा संकल्प केला होता. हा कार्यक्रम रविवारी पार पडला. पुणे जिल्ह्यातील नामांकीत पहिलवानांनी हजेरी लावली होती. शिवाय, हजारोंच्या संख्येने नागरिक देखील उपस्थित होते.

व्हिडीओ पाहा :

स्वराज संकल्प पूर्ण करणार हा याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर अवघ्या २६ मिनिटं ५१ सेकंदात स्वराजने एका दमात एक हजार जोर मारले आहेत. हा पराक्रम करणारा स्वराज पहिलाच असल्याचं त्याचे वडील राहुल यांनी सांगितलं. 

हेही वाचा : पुणे: दोन्ही धर्मातील लोकांना भोंग्याचा त्रास नाही; मंदिर-मशिदीत जाऊन पोलिसांची जनजागृती

करोना काळात अनेक मुलं मोबाईल शिवाय रहात नव्हती. मोबाईलवर गेम खेळण्यात तासंतास घालवत होती. तेव्हा, स्वराज पहाटे उठून जोर मारण्याचा सराव करायचा. स्वराजला महाराष्ट्र केसरी जिंकून वडिलांचं नाव मोठं करायचं आहे. तशी तयारी वडील राहुल यांनी सुरू केली असं त्यांनी सांगितलं. गेल्या आठ महिन्यांपासून केलेल्या परिश्रमाचे फळ स्वराजला मिळाले आहे. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wrestler of 10 year old do one thousand push ups jor in pimpri chinchwad kjp pbs

ताज्या बातम्या