– डॉ. सारिका सातव

साहित्य

* काबुली चणे- २ टेबलस्पून

* पालक- दोन वाटी

* तांदूळ (हातसडीचा)- २ टेबलस्पून

* गाजर, सुरण, रताळे, लाल भोपळा (चिरलेला)- एक ते दीड वाटी

* मीठ- चवीपुरते

* जिरे पावडर, धने पावडर, लसूण-आले पेस्ट

चाट मसाला, लाल तिखट, लिंबू रस (दोन चमचे), टोमॅटो व कांदा चिरून किंवा प्युरी (अर्धा वाटी)

कृती

* चणे रात्रभर भिजवून स्वच्छ धुऊन घ्यावेत.

* त्यानंतर कांदा व टोमॅटो प्युरी, जिरे-धने पावडर, चाट मसाला, लाल तिखट, मीठ, आले-लसूण पेस्ट इत्यादी तेलात परतून थोडे पाणी टाकून उकळी येऊ द्यावे.

* त्यात चणे टाकून चांगले शिजवून घ्यावेत.

* कोरडे करून घ्यावेत.

* आले-लसूण पेस्ट, जिरे, मीठ, लाल तिखट इत्यादी तेलात परतून त्यात मोठी चिरलेली पालकाची पाने वाफवून घ्यावीत.

* गाजर, लाल भोपळा, सुरण, रताळे यापैकी एक भाजी निवडून त्याचे चौकोनी काप करावे.

* आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, जिरे इत्यादी तेलात परतून ते चौकोनी काप वाफवून घ्यावेत.

* हातसडीचा तांदूळ स्वच्छ धुऊन, जिरे व मीठ टाकून शिजवून घ्यावा.

* एका मोठय़ा बाऊलमध्ये चारही शिजवलेल्या सर्व पदार्थाना वाढून घ्यावे. वरून लिंबू रस, चिंच चटणी, हिरवी चटणी यापैकी काहीही एक टाकावे व खाण्यासाठी द्यावे.