|| शेफ नीलेश लिमये

साहित्य

३ टोमॅटो, २०० ग्रॅम चिकन किंवा मटण खिमा, १ कांदा, ५-६ लसणीच्या पाकळ्या, १ गाजर, १ भोपळी मिरची, १ चमचा तेल, १ चमचा क्रीम, १ चमचा टोमॅटो प्युरी, १ चमचा मेयोनिज, सजावटीसाठी कोथिंबीर.

कृती

प्रथम कांदा, भोपळी मिरची, गाजर या तिन्ही भाज्या बारीक चिरून घ्या. लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्या. टोमॅटोमध्ये कापून त्यातील बिया काढून घ्या आणि टोमॅटोच्या वाटय़ा बनवा. याला थोडं मीठ लावून ठेवा.

एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा, लसूण खरपूस परतून घ्या. त्यामध्ये खिमा घालून तो पाणी अटेस्तोवर परतून घ्या. आता यात क्रीम, टोमॅटो प्युरी आणि थोडंसं पाणी घालून खिमा शिजवून घ्या. हा खिमा थंड होऊ द्या. यात मेयोनिज घालून तो टोमॅटोच्या त्या मीठ लावलेल्या वाटय़ांमध्ये भरून घ्या. संध्याकाळच्या पार्टीत हे सॅलड करून सर्वाना खुश करा. कोथिंबीर चिरून सजावट करा.

nilesh@chefneel.com