24 May 2020

News Flash

स्वादिष्ट सामिष : ऑम्लेट करी

नारळ, धने, जिरे, काळी मिरी, बडीशेप हे एकत्र गुळगुळीत वाटून घ्यावे.

दीपा पाटील

साहित्य

* ४ अंडी, खोवलेला ओला नारळ अर्धी वाटी, १ चमचा धने, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा काळी मिरी, पाव चमचा बडीशेप, बारीक चिरलेले २ कांदे, बारीक चिरलेला १ टोमॅटो, अर्धा किसलेला टोमॅटो, १ चमचा आले-लसूण वाटून, १ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा किचनकिंग मसाला, मीठ.

कृती –

नारळ, धने, जिरे, काळी मिरी, बडीशेप हे एकत्र गुळगुळीत वाटून घ्यावे. अंडी फेटून घ्यावी. त्यात थोडा चिरलेला कांदा, टोमॅटो, हळद, मीठ घालून त्याचे ऑम्लेट बनवावे.

ऑम्लेटचे चौकोनी तुकडे करावेत. एका भांडय़ात तेल गरम करावे. त्यात वाटलेले आले-लसूण, कांदा हे लालसर परतावे. मग त्यात किसलेला टोमॅटो घालावा. सर्व मसाले घालून थोडे पाणी घालावे आणि उकळायला ठेवावे. चांगले रटरट उकळल्यावर त्यात ऑम्लेटचे चौकोनी काप टाकून त्याला वाफ आणावी. गरमागरम भाताबरोबर फस्त करावे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2019 4:28 am

Web Title: omelet curry recipe in marathi how to make omelette curry
Next Stories
1 सुरक्षित रक्तदानासाठी..
2 आजारांचे कुतूहल : मल्टिपल स्क्लेरोसिस
3 घरचा आयुर्वेद : पोटदुखी
Just Now!
X