29 May 2020

News Flash

चिकन डोनट

बोनलेस चिकन स्वच्छ धुऊन मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.

साहित्य

साहित्य – पाव किलो चिकन, २ कांदे, ३ अंडी, कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, चमचाभर तिखट, चमचाभर वाटलेलं आलं-लसूण, १ चमचा हळद, १ चमचा धने-जिरे पूड, अर्धा चमचा मिरपूड, अर्धा चमचा गरम मसाला, १ चमचा कॉर्नफ्लोअर, २ चमचे मैदा, ४ चमचे ब्रेडचा चुरा, तेल, मीठ.

कृती

बोनलेस चिकन स्वच्छ धुऊन मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. नंतर त्यात एक अंडे आणि बाकीचे सर्व मसाल्याचे पदार्थ घालून वाटून घ्यावे. हे वाटण चांगले एकजीव व्हायला हवे. हे वाटलेले चिकन एका मोठय़ा भांडय़ात काढून घेऊन फ्रिजमध्ये तासभर ठेवावे.

तासाभरानंतर कढईत तेल गरम करावे. फ्रिजमधले सारण बाहेर काढून त्याचे डोनट बनवावे. आता २ अंडी फोडून घ्यावी. ती फेटून बाजूला ठेवावी. शेजारीच ब्रेडचा चुराही ठेवावा. चिकनचे हे डोनट फेटलेल्या अंडय़ात बुडवून मग ब्रेडच्या चुऱ्यात घोळून तळावे. मस्तपैकी सॉस किंवा चटणीसोबत हे चिकन डोनट फस्त करावे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 3:02 am

Web Title: recipe in chicken donet akp 94
Next Stories
1 निद्रानाश आणि मधुमेह
2 आनंदी मन
3 पंचखाद्य
Just Now!
X