04 July 2020

News Flash

पूर्णब्रह्म : सासम

भाजलेल्या सुक्या मिरच्या, मोहरी, ओलं खोबरं, मीठ, गूळ, हे सर्व व्यवस्थित वाटून घ्या.

शुभा प्रभू-साटम

साहित्य

अर्धवट पिकलेला आंबा आणि अननस फोडी दीड वाटी किंवा आवडीप्रमाणे कमीअधिक, द्राक्षे या प्रमाणाच्या पाव भाग, ओलं खोबरं १ वाटी, सुक्या मिरच्या कोरडय़ा भाजून ४-५, राई, कोरडी भाजून चहाचा चमचा, मीठ, गूळ, कढीपत्ता, फोडणीसाठी शक्यतो खोबरेल तेल किंवा साधे तेल.

कृती

सर्व कापलेली फळे एकत्र करून त्यांना किंचित मीठ लावून ठेवा, भाजलेल्या सुक्या मिरच्या, मोहरी, ओलं खोबरं, मीठ, गूळ, हे सर्व व्यवस्थित वाटून घ्या.

फार पाणी घालू नये. घट्टसर मसाला ठेवा. फळांमध्ये हे वाटण घालून अगदी हलक्या हाताने कालवा. शेवटी द्राक्षे घाला.

वाढायच्या आधी साधारणपणे अर्धा तास मसाला आणि फळे एकत्र करा. सासम फार पातळ नसते. घट्टसर असते आणि याला फोडणी पडत नाही. पण चवीला अप्रतिम लागते.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 1:36 am

Web Title: sasam recipe for loksatta readers zws 70
Next Stories
1 वाहनवारी ‘ऑटो एक्स्पो’तील
2 रॉयल एनफिल्डची क्लासिक-५००
3 मटण ग्वालियर शाही 
Just Now!
X