Panchamrit Recipe: हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात, यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी (बुधवारी) रोजी साजरी केली जाईल. या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो, त्याच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात. शिवाय या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये शिवलिंगावर पंचामृतही अर्पण केले जाते. परंतु, अनेकांना पंचामृत बनवण्याची सोपी पद्धत ठाऊक नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पंचामृत बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.

महाशिवरात्रीला शिवलिंगाला पंचामृत करा अर्पण

महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक शिवलिंगावर जलाभिषेक करतात. तसेच शिवलिंगावर पंचामृतदेखील अर्पण करतात. पंचामृत अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात असे म्हटले जाते.

पंचामृत म्हणजे काय?

पंचामृत म्हणजे पाच पवित्र वस्तूंनी तयार केलेला प्रसाद, तो बनवण्यासाठी पाच अमृत म्हणजे- दूध, दही, तूप, मध आणि साखरेचा वापर केला जातो. याचा वापर तुम्ही देवाला अभिषेक करण्यासाठी तसेच प्रसादासाठीही केरू शकता. याच्या सेवनानेही अनेक फायदे होतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंचामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ कप गायीचे कच्चे दूध
  • १/२ कप दही
  • १ चमचा तूप
  • १ चमचा मध
  • १ चमचा साखर

पंचामृत कसे बनवायचे?

पंचामृत बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात कच्चे गाईचे दूध घाला. त्यात दही, तूप, मध आणि साखर घाला. आता तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा. शेवटी, वर तुळशीची पाने घाला. अशा प्रकारे पंचामृत तयार होते. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हे भगवान शिवाला समर्पित करू शकता.