Fruit cream recipe in marathi: मेजरमेंटमध्ये चूक झाली की आईस्क्रिमचीही पुर्णच वाट लागते. शिवाय आधी दूध आटवा नंतर वेगवेगळ्या पावडर घालून ते ४ तास सेट करा. नंतर पुन्हा फ्रिजरमधून बाहेर काढून पुन्हा ब्लेंडर फिरवा आणि नंतर सेट करा.. असे अनेक कुटाणेही करावे लागतात. एवढं करूनही आईस्क्रिम छान सेट होईल किंवा मग त्यात बर्फ जमणार नाही, याची काही गॅरेंटी नसतेच.. त्यामुळे मग तुम्ही घरच्या घरी फ्रूट क्रीम रेसिपी बनवू शकता. अगदी आईस्क्रीमसारखी लागणारी ही क्रिम लहान मुलांनाही खूप आवडेल.

फ्रूट क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

फ्रेश क्रीम एक कप
आईस क्यूब
सफरचंद
केळी
डाळिंब
पपई
स्ट्रॉबेरी
किवी
आवडीचे इतर फळे
बदाम
काजू
मनुका
साखर किंवा मध

फ्रूट क्रीम बनवण्याची पद्धत

उपवासासाठी फ्रूट क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम बर्फाचे तुकडे एका मोठ्या भांड्यात ठेवा. नंतर या बर्फाच्या भांड्यात एक वाटी ठेवून त्यात फ्रेश क्रीम घालून नीट फेटून घ्या. काटा चमच्याच्या साहाय्याने क्रीम फेटून स्मूद करा.

आता गोडव्यासाठी बारीक केलेली साखर किंवा थोडे मध घाला. आता हे नीट मिक्स करून फ्रीजरमध्ये ठेवा. क्रीम फ्रीजरमध्ये असताना सर्व फळे लहान आकारात कापून घ्यावीत.

द्राक्षे, डाळिंब, सफरचंद, केळी, पपई अशी फळे एकत्र करून एकाच ठिकाणी ठेवावीत. तुम्ही यात तुमच्या आवडीचे फळं वापरू शकता.

हेही वाचा >> पोकळ्याची भाजी आणि देठी; पौष्टिक अन् चवदार भाजी; ही घ्या सोपी रेसिपी

आता जेव्हा खायचे असेल तेव्हा ही फळे तयार क्रीममध्ये घाला. ड्रायफ्रूट्सचे लहान तुकडे करा. जेणेकरून तोंडात घातल्यास क्रंची टेस्ट येईल. कापलेली फळं आणि ड्रायफ्रूट्स क्रीमध्ये मिक्स करून थंडगार सर्व्ह करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची फळे त्याचबरोबर ड्रायफ्रूट अगदी टुटीफ्रुटी ही घालू शकता. एक स्कूब व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा यात घालून मस्त टेस्ट लागते.